lokanand

कोरोना लसीकरणाची दहा ठिकाणी ड्रायरन मोहिम यशस्वीरित्या संपन्न

जालना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज दि. ८ जानेवारी  रोजी कोरोना लसीकरणासाठी जालना जिल्ह्यात तीन ठिकाणी कोविन ॲपमध्ये लॉगईन पद्धतीने तर सात ठिकाणी स्वयंस्फुर्तीने ड्रायरन मोहिम राबविण्यात आली. यापूर्वी  दि.२ जानेवारी  रोजी जिल्ह्यात ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली होती.

क्षेत्रिय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे, कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ड्रायरनचे आयोजन करण्यात आले.

      जालना जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय, परतुर, जिल्हा परिषद शाळा, मंठा, ग्रामीण रुग्णालय, बदनापुर या ठिकाणी कोविन ॲपमध्ये लॉगईन पद्धतीने तर प्राथमिक आरोग्य केंद्र, पिरपिंपळगाव, ग्रामीण रुग्णालय, नेर, विवेकानंद हॉस्पीटल, जालना, जिल्हा परिषद शाळा, शहागड, मुलांचे शासकीय वसतीगृह, भोकरदन जिल्हा परिषद शाळा, जाफ्राबाद तसेच देशमुख विद्यालय, घनसावंगी येथे स्वयंस्फुर्तीने ड्रायरन घेण्यात आला.

या ड्रायरनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडण्यात आले. त्यानंतर कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात आली. तसेच  लसीकरणानंतर लाभार्थ्यांना अर्ध्या तासासाठी निरीक्षण खोलीमध्ये ठेवण्याचेही प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले.

कोरोना लसीकरण प्रात्यक्षिक सत्रात हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन