lokanand

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल *पिकांवर संक्रात येण्याची भिती *शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

*

भोकरदन,(प्रतिनिधी)- ऐन हिवाळ्यात पावसाळ्या सारखे वातावरण निर्माण झाले असून रब्बी पिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच जास्त पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना म्हणावा तसा उतारा मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी रब्बी पिकांची अपेक्षा ठेवली असतांनाच आता पिके ऐन जोमात असतांनाच वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या पिकांवरहीसंक्रांतयेण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र तालुकाभरात दिसून येत आहे.
भोकरदन तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून या वातावरनामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका सह इतर पिकांवर मावा, चिकटा तसेच हरभर्‍यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर काही पिकांवर जंतू ही तयार झाले आहेत.
खरे तर हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडणे गरजेचे असते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमदार येतात. यावर्षी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. नदी-नाल्यांना मोठा पूर येऊन छोटे मोठे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. तसेच विहिरींना ही मोठया प्रमाणात पाणी आले. जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगामातील मका, ज्वारी, कापूस, सोयाबीन सह इतर पिकांना बर्‍यापैकी फटका बसला. परंतु याची कसर रब्बी हंगामात निघेल ही अपेक्षा शेतकरी धरून बसला होता परंतु मागील काही दिवसांपासून वातावरणात नेहमीच बदल होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस तर कधी मोठ्या प्रमाणात धुई पडते त्यामुळे रब्बी च्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन