lokanand

बसच्या धडकेत पती-पत्नी ठार

भोकरदन:भोकरदन ते जाफराबाद रस्त्यावरील विरेगाव येथील पुलाजवळ औरंगाबाद हून मलकापूर कडे भरधाव जाणार्‍या एसटी ने भोकरदन येथे लग्नाच्या कार्यक्रमास वालसावंगी येथून येणार्‍या दुचाकीस जोराची धडक दिली. दुचाकी वरील पती पत्नी ला दवाखान्यात उपचारासाठी नेले परंतु त्यांचा मृत्यू झाला. वालसावंगी ता. भोकरदन येथील विष्णू त्रंबक गारुडी( वय 55) व त्यांच्या पत्नी मंगलाबाई विष्णू गारुडी (वय 50),हे आपल्या दुचाकीवर भोकरदन येथे आज दि 7 रोजी एका लग्नासाठी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान येत होते. विरेगाव जवळील पुलाजवळ आल्यानंतर औरंगाबाद-मलकापूर
(MH40N 9948) या एसटीने जोराची धडक दिली. दुचाकी वरील पती पत्नी ला जोराची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोघेही गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना तात्काळ जालना येथे हलविण्यात आले परंतु जालना येथे नेत असताना पती विष्णू गारुडी यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली तर जालना येथे उपचारा दरम्यान मंगलाबाई ही मरण पावल्या. सदरील दुर्दैवी घटनेने वाल सावंगी गावावर शोककळा पसरली आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन