lokanand

सोमवार ते गुरूवार दरम्यान कापूस खरेदी बंद राहणार!

जालना,(प्रतिनिधी)-भारतीय कापूस निगम लिमिटेड ने दिलेल्या निर्देशानुसार सोमवार दि.11 ते गुरूवार दि. 14 जानेवारी या कालावधीत कापूस खरेदी बंद राहणार असून शेतकर्‍यांनी या कालावधीत कापूस विक्रीसाठी न आणता आपली गैरसोय टाळावी. असे आवाहन माजी मंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना अर्जुनराव खोतकर म्हणाले, शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वप्रथम सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून येथे कापूस खरेदी सुरू आहे . तथापि महाराष्ट्र जिनिंग कॉटन असोसिएशनने दिनांक अकरा व बारा जानेवारी या कालावधीत खरेदी बंद राहणार असल्याचे भारतीय कापूस निगम लिमिटेडला कळवले होते. तसेच दि. 13 व 14 दरम्यान मकर संक्रांतीचा सण असल्याने या कालावधीत कापूस खरेदीस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान खरेदी केंद्र व उपके़द्रांवर या पुर्वी दिलेल्या कापसाचे ऑनलाईन पेमेंट देण्यासाठी कर्मचारी हजर राहतील. तरी उपरोक्त कालावधीत शेतकर्‍यांनी कापूस विक्रीसाठी आणू नये व आपली गैरसोय टाळावी असे आवाहन सभापती अर्जुनराव खोतकर, उपसभापती भास्करराव पाटील दानवे ,बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे व संचालक मंडळाने केले आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन