lokanand

अपहरण केलेेल्या महिलेची पोलिसांनी केली सुटका

जालना(प्रतिनिधी) अपहरण केलेल्या एका 50 वर्षीय महिलची पोेलिसांनी सुखरूप केल्याची घटना 9 जानेवारी रोजी घडली.
या प्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, नवीन मोढा भागातील एक 50 वर्षीय महिलेस मोढ्या जवळून चार चाकी वाहनात आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अपहर केले होते. दरम्यान अपहरण कर्त्यांच्या तावडीतून सुटून सदर महिला एका शेतात जावून लपली. तेथून तीने मांडवा येथील आपल्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. ही माहिती नातेवाईकांनी चंदनझिरा पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ महिलेचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार रेल्वे पटरी आणि उस व मोसंबी शेताचा शोध सुरू केला. दरम्यान नागरीक व नातेवाईकांच्या मदतीने वेगवेळे पथक नेमुन शोध मोहिम सुरू केली. शहरा जवळ रेल्वे पटरी लगत असे शेत आडळून आले. तेव्हा शेतात महिला मिळून आली. पोलिसांनी नातेवाईकांनी तीला धीर देवून चंदनझिरा पोलिस ठाण्यात अपहरकर्त्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. सदरील कामगीरी वरीष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कर्मचारी अनिल काळे, परमेश्‍वर हिवाळे, होमगार्उ आदींनी पार पाडली.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन