lokanand

केवळ ‘राजकारण’चनव्हे, लोकांचे भले करणारा नेता:ना. राजेशभैय्या टोपे

महाराष्ट्रातील बारा कोटी जनता अगोदरच कोरोना या आजाराच्या भीषणतेने हादरली होती. तर दुसरीकडे एका गंभीर आजाराने राज्याचे आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे यांच्या मातोश्री (कै.) शारदाताई अंकुशराव टोपे यांच्यावर मुंबईतच एका दवाखान्यात उपचारसुरू होते. दररोज आईच्या तब्येतीची पाहणी व विचारपूस करण्यासाठी दवाखान्यात जाणे, याशिवाय मुंबईच्या धारावीसह अनेक शहरांत कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीवर मातकरण्यासाठी आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे मंत्रालयातदोन, चारतासनव्हे तर चक्क बारा तास बसून, जिल्हेच नव्हे, वेळप्रसंगी राज्यातील तालुका, तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन संपुर्ण आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व जबाबदार कर्मचा-यांच्या बैठका घेऊन उपाययोजनांच्या सुचना व त्यांच्या अंमलबजावणीची घाई करू लागले. आईंच्या प्रक्ूतीकडे तर लक्ष होतेच, परंतु बारा कोटी जनतेचा जीव महत्वाचा त्यामुळे स्वत:  दररोज केवळ तीन तासांचीच झोप घेऊ लागलेल्या राजेशभैय्या टोपे यांचे आरोग्यमंत्री म्हणून जनतेच्या आरोग्याकडे काळजीपुर्वक लक्ष होते. त्यामुळेच सुरूवातीला धारावीतील या आजाराची व टप्प्याटप्याने संपुर्ण,महाराष्ट्रातकोरोनाविषयीची भयावहता कमी झाली. परंतु याच काळात ना. राजेशभैय्या टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे निधन झाले. त्यामुळे संपुर्ण टोपे कुटुंबियांवर तसेच त्यांचे आप्तेष्ट, समर्थकांवर शोककळा निर्माण झाली. लोकांनी  ‘लोकांसाठी चालवलेली कारभार म्हणजेच लोकशाही’, हीच लोकशाहीची मुळ व्याख्या. आजही वयाच्या ऐंशीव्या वर्षी तरूणांना लाजवेल, असे कार्य करणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ, देशाचे माजी केंद्रीय क्ूषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची कार्यप्रणाली याच लोकशाहीच्या व्याख्येला अनुसरून आहे. त्यामुळेच सलग पन्नास वर्षे शरद पवार यांचे राजकारणातील वर्चस्व सुरूवातीला काँग्रेस वनंतर बाहेर पडून त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड कायम आहे. राजकारणात अंकुशराव टोपे यांचा राजकीय प्रवेश त्यांच्या तरूण वयातच झाला. एकाच पक्षात असल्याने व शरद पवार यांची लोकशाहीला अनुकूल हीच कार्यप्रणाली पाहून अंकुशराव टोपे त्यांचे खंदे समर्थक झाले. हीच प्रेरणा आपसुकच राजेशभैय्या टोपे यांना मिळाली. याच प्रेरणेनेB भैय्यांनी आपल्या राजकीय कार्याची मजल, दरमजल सुरू ठेवली. पुर्वी अंबड व नंतर घनसावंगी तालुक्यात आलेल्या पाथरवाला या गावातच राजेशभैय्या टोपे यांचा जन्म झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अंबड येथे घेतल्यानंतर उच्चशिक्षणासाठी औरंगाबादकडे आगेकुच केलेल्या राजेशभैय्यांचा राजकीय प्रवेश वडील अंकुशराव टोपे तत्कालिन खासदार असतानाच झाला.*

-संजयकुलकर्णी-, दै. लोकआनंद, जालना.*

.*

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन