lokanand

कोरोना योद्ध्यांना बळ देणारे आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे

कर्मण्येवाधिकारस्ते मा. फलेषू कदाचन ।मा कर्मफलहेतुभूमी ते संगो स्तवकर्मणि !!वरील पंक्ती तंतोतंत सार्थ ठरवित ज्यांचे काम अविरपतणे अखंड चालु आहे. अशा आदरणीय मा.श्री. राजेशभैय्या टोपे साहेब यांच्याबद्दल जितके लिहावे, बोलावे तितके कमीच आहे गोदाकाठी वसलेल्या पाथरवाला या अगदी छोट्याशा गावातून ज्यांनी सहकार, शिक्षण, राजकारण या क्षेत्रात आपल्या अत्युच्च अशा कारकिर्दीने एक वेगळा ठसा मराठवाड्यासारख्या क्षेत्रात उमटवला, अशा स्व.श्री. अंकुशराव टोपे साहेब व स्व.शारदाताई टोपे यांचे सुपूत्र म्हणजे मा.श्री. राजेशभैय्या टोपे साहेब नोव्हेंबर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यापासून आजतागायत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून साहेबांनी केलेले योगदान हे उल्लेखनीय आहे. कोरोनासारख्या वैश्विक महामारीच्या काळात महाराष्ट्रात आरोग्याच्या दृष्टीने साहेबांनी उत्तम पद्धतीने परिस्थिती हाताळली तसेच नियंत्रणात आणली.  साहेबांच्या आदरणीय मातोश्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतांना, तसेच त्यांच्या अकाली दु:खद निधनाने टोपे कुटूंबियांच्या परिवारात जी एक न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली; अशा प्रसंगी सुध्दा न खचता, न डळमळता साहेबांनी आपला प्रत्येक क्षण जनतेसाठी, समाजाकरिता पर्यायाने महाराष्ट्राकरिता दिला. लॉकडाऊन मार्चमध्ये जाहीर होण्या आधीपासून ते आजपर्यंत साहेबांच्या आवाजातील आपुलकी, आर्तता, विश्वास, समाजाविषयीची कळवळ ही जाणवते आणि त्यासोबतच त्यांचे शब्द हे समाजाला धीर, दिलासा देतात. जनसामान्यांच्या सर्व समस्यांची जाणीव साहेबांना आहे. राजकारण क्षेत्राशिवाय आदरणीय स्व.श्री. अंकुशराव टोपे साहेबांनी मोठ्या कष्टाने आत्मविश्वासाने व दुर दृष्टीने उभ्या केलेल्या ”मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या” माध्यमातून विद्यादानाच्या अमुल्य कार्याला भैय्यासाहेब पुढे नेत आहेत. मत्स्योदरी शिक्षण संस्था ही मराठवाड्यातील एक दर्जेदार शिक्षण देत गुणवत्तेची परंपरा कायम राखणारी संस्था म्हणून नामांकित आहे. अशा कर्तृत्ववान आदरणीय मा.श्री. भैय्यासाहेबांना त्यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त मन:पुर्वक हार्दिक अभिष्टचिंतन !!

प्रा. सुजाता पाटील 

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन