lokanand

डोक्यात फावडे घालून चुलत्याकडून पुतण्याची हत्या; शेेतीच्या वादातून घटना तिघांना अटक

जालना,(प्रतिनिधी)-भोकरदन तालुक्यातील कोळेगावात शेतीच्या वादातून चुलते आणि पुतन्यात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या पुतन्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, जखमीचा मृत्यू होताच पोलिसांनी तपासचक्रेे ङ्गिरवून अवघ्या दोन तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या,या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (ता.9) सायं. 5.30 वाजेच्या सुमारास चुलते सुखदेव सारजूबा गावंडे व पुतणे कौतिकराव आनंदा गावंडे (37) यांच्यात वाद होेवून होनामारी झाली . यावेळी चुलत्यासह त्यांच्या दोन मुलांनी मारहान केली. यात पुतने कौतिकराव गावंडे यांच्या डोक्यावर फावडयाचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झालेे. जखमी अवस्थेत ते भोकरदन पोलिस ठाण्यात मोटारसायकलवरून गेले होते. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सिल्लोड येथे पुढील उपचारासाठी पाठविले होते. तेथून उपचार करून पुन्हा भोकरदनला येऊन त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पुन्हा जखमी कौतिकराव गावंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविण्यात येत असतांना मध्यरात्री दीड वाजता त्यांचा रस्त्यातच मृत्यु झाला. फिर्यादीचा मृत्यु झाल्याचे कळताच पोलिसांनी रात्रीतून तपास चक्रे फिरवून आरोपी चुलते सुखदेव सारजूबा गावंडे, चुलत भाऊ सुधाकर गावंडे आणि परमेश्वर गावंडे यांना ताब्यात घेतले आहे._ स.पो.नि. राजाराम तडवी, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोहेकाँ. सूर्यकांत केंद्रे, पोना. रुस्तुम जैवळ, पोकॉ. अभिजित वायकोस, राहुल घुले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी केली.
सहशिक्षक म्हणून होेते कार्यरत
घटनेतील मयत तरून कौतिकराव गावंडे हे सहशिक्षक म्हणून जाङ्गराबाद तालुक्यातील दळेगव्हाण येेथील जय भवानी विद्या मंदिर या शाळेत कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, दोेन भाऊ असा परिवार आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन