lokanand

बेरोजगारांना गंडा घालणार्‍याचे फिल्मीस्टाईलने केले अपहरण *9 अपहरणकर्ते बेरोजगारांना अटक * सदर बाजार पोलिसांची कामगिरी*

जालना (प्रतिनिधी) :- जालना बस स्थानक परिसरातून फिल्मीस्टाईल्सने एका तरूणाचे अपहरण करणार्‍या 9 आरोपींच्या अवघ्या 16 तासाच्या आत मुसक्या आवळ्यात सदर बाजार पोलिसांना यश आले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी पत्रकासर परिषदेत दिली.
या संबधी माहिती देताना ते म्हणाले की, बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथील विठ्ठल विजयसिंग जारवाल या तरूणाचे 14 जोनवारी रोजी सकाळी 11.30 वाजच्या सुमारास जालना बस स्थानक येथून पांढर्‍या रंगाच्या टाटासुमोमधून आलेल्या 8 ते 9 जणांनी फिल्मीस्टाईलने अपहरण केले होेते. ही माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पो.नि संजय देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहुण तपासास सुरूवात केली. दरम्यान पवन घुसींगे हा तरूणपुढे आला. त्याने सांगितले की, मी विठ्ठल जारवालला कोणाचा तरी फोन आला होता. त्याने विठ्ठलला जालना बस स्थानकात बोलावले होेते. त्यावरून विठ्ठलने मला जालन्यात एका व्यक्तीला कागदपत्रे द्यायचे आहे असे म्हणून सोबत अ ानले होते. मात्र येथे आल्यावर त्या लोकांनी त्याचे अपहरण केल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांना सदर बाजार पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तात्काळ सुत्रेे हलवून पथक रवाना केले. गाडीच्या क्रमांकावूरून ती कोणत्या मार्गानेगेली याची माहिती काढून गाडी अंबड, पैठण शवगा मार्गे पुढे जात असल्याने अहमद नगर, कोल्हापूर सातारा येथील नियंत्रण कक्षास याची माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे सातारा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुनाळ व त्यांच्या पथकांनी नाकाबंदी करून गाडी पकडली. गाडीमधील 9 आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या तावडीतून अपहरण झालेल्या तरूणाची सुटका केली. या सर्व आरोपींना जालन्यात आणन्यात आले. आरोपींमध्ये वैभव भैरू पाटील (21रा. तिरपण्या ता. पन्हाळा जि. कोल्हापूर), सतिश विठ्ठल गराडे (23रा. आमनेवाडी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (29 रा. करंजोशी ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर), पुष्पराज मारोती जाधव (26रा. युलूर ता. वाळवा जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे(35 रा. अगरणधुळगाव ता. कवठेमहाकाळ जि. सांगली), मनोहर भास्कर शेेशवारे (42रा. अगरणधुळगाव ता. कवठेमहाकाळ जि. सांगली), नितीन बाळू दाडे 23, गणेश पांडूरंग दाडे 29, शरद बाळू दाडे (25 तिघे रा. वाफळे ता. मोहोळ जि.सोलापूर) या 9 जणांचा समावश आहे.सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय देशमुख, कर्मचारी कैलास खाडे, समाधान तेलंग्रेे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी पार पाडली.

नौकरीचे अमिष दाखवून पैसे आणि मुळ कागदपत्र घेतलेे म्हणून अपहरण..
अपहरण झालेल्या विठ्ठल जारवाल या तरूणाची बहिन सातारा येथे दिलेली आहे. बहिनीकडे सातारा येथे गेला तव्हा त्याची तेथील वैभव शेशवारे या बेरोजगार तरूणाशी ओळख झाली. तेव्हा माझे दिल्लीला मंत्री नातेवाईक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला सरकारी नौकरी लावून देतो. आम्ही डमी उमेदवार बसवून परिक्षाा पास करून घेतो असे सांगून जारवाल याने वैभवसह बर्‍याच बेरोजगार तरूणांच मुळ कागदपत्रे घेतली होती. आणि तीच कागदपत्रे परत देण्यासाठी तो पैशाची मागणी करत होता. त्यामुळे वैभव शेशवारे याने वेळोे-वेळी त्याला पैसे सुद्धा दिले होतेे. मात्र विठ्ठल जारवाल यानेे कागदपत्रे परत केली नव्हती. उलट तो सांगत होता की, कागदपत्रे दिल्लीला आहेत. दिल्लीला जावून आणावे लागतील. मला दिल्लीला जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढून द्या. आणि खर्च पण द्या. त्यामुळे वैतागलेल्या बेरोज तरूणांनी त्याच्याकडून आपले मुळ कागदपत्र हस्तगत करण्यासाठी नियोजन करून अपहरणाचा प्लॅन आखला. त्यानुसार दोेन वेळा जालन्यात आले मात्र विठ्ठल जारवाल हा त्यांना भेटण्यासाठी येत नव्हता.14 जानेवारी रोजी बसस्थानक जालना येथे बोलावले. बसस्थानकावर बरेच प्रवाशी असतात तेथे बेरोजगार तरूण आपल्याला काही करू शकणार नाही. त्यामुळे विठ्ठल जारवाल हा बसस्थानक येथे आला आणि अपहरणकर्त्या बेरोजगारांनी त्याचे अपहरण केले. मात्र, पोलिसांनी त्याचा छडा लावून 9 जणांना अटक करून बेरोजगारांना गंडा घालणार्‍या या तरूणाची सुटका केली.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन