lokanand

राजस्थानी महिला मंडळ अंबडतर्फे आयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी निधी

अंबड,(प्रतिनिधी)- अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी अंबड येथे दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी निधी संकलन अभियानास प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन आंबेडकर चौक, हनुमान मंदिर चक्रीचौक, महाराष्ट्र द्वार मार्गे जाऊन याचा समारोप राममंदिर येथे करण्यात आला .
राजस्थानी महिला मंडळाच्या भगिनींनी संक्रातीच्या वेळी हळदीकुंकू प्रोग्राम न घेता त्याचा जमा झालेला निधी अयोध्या येथील श्रीराम सितामैय्या मंदिर निर्माण कार्यासाठी 31501 रुपये राजस्थानी महिला मंडळ अंबड तर्फे श्री आत्मानंद स्वामी महाराज ताडहातगाव व श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन समिती चे सदस्य नीरज दरक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी राजस्थानी महिला मंडळ च्या अध्यक्षा- डॉ सौ अनुराधा गट्टानी, सचिव – सौ शीतल करवा, उपाध्यक्ष -सौ अनिता मंत्री, कोषाध्यक्ष – सौ टिना राठी, संगठन मंत्री – सौ प्रीती शर्मा, डॉ सौ सुषमा भाला, सौ प्रमिला लाहोटी, सौ शोभा सोमाणी, सौ शीतल दरक, सौ अश्‍विनी गिलडा, सौ सरोज खंडेलवाल, सौ प्रणिता गिलडा, सौ उषा भन्साळी, सौ पुजा शर्मा ,सौ राधिका शर्मा ,सौ सुरेखा अग्रवाल, सौ नम्रता करवा, सौ जयश्री सोडाणी व इतर सदस्य उपस्थित होते.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन