lokanand

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गोर सेनेचे साखळी उपोषण

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गोर सेनेच्या वतीने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून आज उपोषणाचा आजचा दुसरा दिवस होता. आळीपाळीने सर्व तालुके या साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सांगितले. केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील पन्नास दिवसांपासून दिल्ली येथे शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु असून आतापर्यंत या आंदोलनात जवळपास ऐंशी गौर सेनेच्या वतीने संपूर्ण देशभरात दि. वीस ते पंचवीस जानेवारी या कालावधीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. बुधवारी ( ता. 20) व गुरूवारी ता.21 घनसावंगी तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी या साखळी उपोषणात सहभागी झाले. केंद्र सरकारने तीनही शेतकरी विरोधी कायदे विनाअट तात्काळ रद्द करावे, सर्व पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा, बियाणे व खतांवरील अनुदान वाढविण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कामगार विरोधी परित केलेले तीनही अधिनियम तात्काळ रद्द करावे. उपोषणकर्त्यांच्या या मागण्या असून मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उपोषणात जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, अर्जुन चव्हाण, जिल्हा संघटक सुधाकर जाधव, सहसंघटक प्रकाश राठोड, अमोल चव्हाण, निरंजन चव्हाण , शहराध्यक्ष शरद राठोड हे सहभागी झाले आहेत. मराठा सेवा संघ प्रणित कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पाटील चंद यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. उद्या दि. 22 रोजी मंठा, दि. 23 ला परतूर, 24 रोजी जालना, तर दि. 25 रोजी अंबड तालुक्यातील गौर सेनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सांगितले.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन