lokanand

इंधन बचतीसाठी भारत सरकारच्या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन

*संरक्षक क्षमता महोत्सव * 31 जानेवारीला सायकल रॅली

जालना,(प्रतिनिधी)- संरक्षण क्षमता महोत्सव हा राष्ट्रीय कार्यक्रम 16 जानेवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. भविष्यकाळात इंधन टंचाई जाणवू नये, यासाठी इंधनाचा आवश्यक वापर कसा करावा, जेणेकरून इंधन बचतही होईल, यासाठीच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून संरक्षण क्षमता महोत्सवाच्या माध्यमातून इंधन बचतीविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती एचपीसीएल व बीपीसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या विक्री अधिकार्‍यांनी जालना येथे दि. 23 जानेवारी रोजी एका हाँटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
एचपीसीएलचे जालना सिनियर सेल्स मँनेजर किशोर अकुला, बीपीसीएलचे जालनासेल्स आँफिसर सतीश अहिरवाल, क्वालिटी कंट्रोल औरंगाबादचे असिस्टंट आँफिसर मनिभूषण यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले. पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धांचे धोरण आणि रणनितीचा सरकारला मदत करण्यासाठी अग्रणीय आहे, असे या अधिका-यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.

पर्यावरणाचेे रक्षण करणे हे ध्येय- किशोर अकुला
पेट्रोलियम संवर्धन संघटना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयक यांनी पुढाकार घेवून संरक्षण क्षमता महोत्सव हा राष्ट्रीय कार्यक्रम 16 जानेवारी 2021 ते 15 फेबु्रवारी दरम्यान आयोजित केला आहे. जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालने. परकीय तिजोरीवरील ओझे कमी करणे, इंधनाच्या ज्वनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायुच्या प्रतिकुल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचे भारत पेट्रोलियमचे मॅनेजर सतीश अहिरवाल यांनी सांगितलेे. या महोत्सवात 31 जानेवारीला सायकल रॅली तसेच शाळा महाविद्यालयात चर्चासत्र होईल.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन