lokanand

आठवडी बाजारात मोबाईल चोेरांचा सुळसुळाट

एकाच दिवसात चार घटना * दोघांचे महागडे मोबाईल चोरले

जालना,(प्रतिनिधी)-जालना शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आह. त्यामुळे नगरीक त्रस्त झाले असून या मोबाईल व पाकिटमारांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
जालना शहरातील गांधी चमन ते रेल्वेस्टेशन या मुख्य मार्गावरच दर रविवारी आठवडी बाजार भरतो. रस्त्यावरच दोन्ही बाजूने भाजी विक्रेर्त्यांची दुकाने थाटलेली असतात. त्यामुळे या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होत असते, याच गर्दीचा फायदा घेत चोरटे नागरीकांच्या खिशातील मोबाईल, पॉकिट चोरून नेतात.24 जानेवारी रोजी आठवडी बाजारातून तीन ते चार जणांचे मोबाईल चोरीस गेले त्यातील दोन जणांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.यशवंतनगर येथील प्रमोद हिरामन बीडकर हे रविवारी सकाळी 11 वाजेेच्या सुमारास आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 17 हजार रूपये किमतीचा विओ कंपनीचा मोबाईल चोरून नेला. तसेच श्रीकांत बेलेकेरी यांचा 20 हजार रूपये किमतीचा ओपोेे कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला.
वाढत्या मोबाईल चोरांना आळा घालन्यासाठी पोलिसांनी आठवडी बाजारात बंदोबस्त तैनात करावा. व चोरट्यांना पायबंद घालावे अशी मागणी होत आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन