lokanand

बाष्पीभवन नियंत्रण : जगातील पहिल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजनेचा शुभारंभ बाष्पीभवन नियंत्रण : जगातील पहिल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजनेचा शुभारंभ

घाणेवाडी जलाशयाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही-आ.कैलास गोरंट्याल

जालना : अनेक कारणांमुळे घाणेवाडी जलाशयातील पाणी साठा कमी होत असला तरी या तलावाच्या विकासासाठी आपण निधीची कमतरता भासू देणार नाहीत. निजामकालीन असलेल्या या तलावाला सत्तर वर्षे पूर्ण होत असली तरी अजूनही तो शंभर वर्षे टिकवण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करु, अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. बाष्पीभवन नियंत्रण, साठवण पुन:स्थापना आणि इतर लाभांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजना या तंत्रज्ञान कामाचा शुभारंभ आज बुधवारी आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशय येथे करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, पुनम स्वामी, न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे नगर अभियंता राजेश बगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी देशातील नव्हे तर जगातील पहिला पायलट प्रकल्प राबवण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित सभारंभात पुढे बोललतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, या जलाशयाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून या परिसरातील झाडे- झुडपे तोडून घेण्यात आली असली तरी हा तलाव यापुढे शंभर वर्षे जीवंत राहिला पाहिजे. बाष्पीभवनामुळे तीस ते चाळीस टक्के पाणी वाया जात आहे. हे पाणी वाया न जाता तेही उपयोगात यावे म्हणून सर्वात प्रथम हा पायलट प्रकल्प या राबविला जात आहे, याचा आपल्याला अभिमान असून भविष्यात या तलावाच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.  घाणेवाडी येथील तलाव हा निजामकालीन असून साठवलेल्या प्रचंड गाळामुळे पाण्याची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. एकीकडे ही स्थिती असतांना दुसरीकडे मात्र शहराची लोकसंख्या वाढलेली आहे. पर्यायाने लोकांची तहान भागवण्यासाठी नगर पालिकेला जायकवाडी जलाशयाचा महागडा पर्याय   शोधावा लागला आहे. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नसतांनाही नाविजाने नाथ सागरातून पाणी आणून जालनेकरांची तहान भागवागी लागत आहेत. या सार्‍या गोष्टींचा विचार करुनच आ. कैलास गोरंट्याल यांच्या विशेष सहकार्यातून नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांच्या प्रयत्नातून जागतिकस्तरावरचा पायलट प्रकल्प हा जगात सर्वप्रथम घाणेवाडी येथे राबवण्यात येत आहे. पुणे येथील मार्क सिव्हील टेक्नॉलॉजी ही कंपनी या तलावातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याबरोबरच  साठवण क्षमता वाढवण्यासह अन्य काही लाभाचे कार्य या ठिकाणी करणार आहे. तलावातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी सदरची कंपनी ही कोणत्याही केमिकलचा वापर न करता नैसर्गिकरित्या आणि तलावाचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून बांबूची झाडे लावण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच तलावाची साठवण क्षमता वाढण्यास देखील मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी रविंद्र पाठक, अर्जुन पाठक, रोहीत घोडे, मयुरेश्‍वर भानुशाम, कुणाल लिंभोरे हे स्थापत्य अभियंते कार्य करत आहेत.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन