lokanand

बहुचर्चि KGF Chapter 2 ची प्रतीक्षा संपली, या तारखेला होणार रीलिज

हा चित्रपट कधी आणि किती भाषांमध्ये रीलिज होणार वाचा सविस्तर

Share
Share

मुंबई: कन्नड अभिनेता यशचा KGF या चित्रपटानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता त्याच्या पुढचा सिक्वेल KGF2 कधी येणार याची प्रतीक्ष सर्वांना होती. नुकतीच त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमीकेत यश असणार आहे. तर संजय दत्त, रवीना टंडन देखील या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहेत. टीझरमध्ये या सर्वांना पाहता येणार असल्यानं आता सर्वांची प्रतीक्षे अगदी शिगेला पोहोचली आहे.

KGF Chapter2 हा चित्रपट 5 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेतून प्रदर्शित होणार आहे. तर रॉकी या भागात आपला बदला आणि आईला दिलेलं वचन पूर्ण करणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अशा आहे.

नुकतीच या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 16 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा सिनेमा चित्रपटगृहात 16 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकेच नाही तर ‘KGF Chapter2’ च्या या टीझरने यूट्यूब व्ह्यूजच्या बाबतीत अनेक विक्रम केले.

या सिनेमाचा टीझर आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरयांच्या प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाचे हिंदी हक्क विकत घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत घोषणा केली होती.

या चित्रपटाचा पहिला पार्ट 2018मध्ये प्रदर्शित झाला होता. जो आजही सर्वांच्या मानावर अधिराज्य गाजवत आहे. भाग दोन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यामुळे सर्वजण 16 जुलैची आतूरतेनं वाट पाहात आहेत. पहिल्याप्रमाणेच दुसराही भाग बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक करेल असा विश्वास सर्वांना आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन