lokanand

Covid-19 vaccine: सीरम इन्स्टिट्यूटची नवी लस बाजारात येणार, अदर पुनावाला यांची माहिती

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकन कंपनीच्या कोविड 19 लसीच्या स्थानिक मानवी चाचणीसाठी अर्ज केला आहे. नोव्हावॅक्सची लस फेज III च्या चाचण्यांमध्ये प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. डेटा समोर आल्यानंतर जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीने ही चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Covid-19 vaccine: जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता नोव्हावॅक्स (Novavax) लसीची मानवी चाचणी करणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला म्हणाले की ब्रिटनमध्ये मानवी चाचण्या दरम्यान नोव्हावॅक्सची लस 89.3 टक्के सुरक्षित असल्याचे आढळले. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना देशांतर्गत पातळीवर मानवी चाचण्या घेण्यासंदर्भात अर्ज देण्यात आला आहे. कंपनीला आशा आहे की नोव्हावाक्स लसीच्या चाचणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

सीरम इन्स्टिट्यूट नोव्हावाक्स लसीची मानवी चाचणी घेणार
पूनावाला म्हणाले, “अमेरिकन कंपनीचा प्रभावी डेटा मिळाल्यानंतर आम्ही ड्रग कंट्रोलर कार्यालयाकडे यापूर्वीच अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांनीही आता लवकरच यास मान्यता द्यावी.” नोव्हावॅक्स लसीची फेज III ची मानवी चाचणी 15 हजार व्होलॅन्टियर्सवर घेण्यात आला. या चाचणीत सहभागी होणाऱ्यांमध्ये 18 ते 84 वय वर्ष असलेल्या स्वयंसेवकांचा समावेश होता. ही लस प्रभावी ठरल्यानंतर कंपनीला यूके, युरोपियन युनियन आणि इतर देशांतही अर्ज करण्याची अपेक्षा आहे. सीरम इन्स्टिट्यूट याअगोदरचं ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकासोबत मोठ्या प्रमाणात लस तयार करत आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन