lokanand

अख्खे घर साफ करणार्‍या दरोडेखोरांचा मोरक्या जेरंबद, 10 लाख 30 हजारा मुद्देमाल जप्त

जालना(प्रतिनिधी) घरातील सदस्यांच्या तोंडावर विषारी स्प्रे मारून आयशर टेम्पोतून घरातील दहा लाख तीस हजाराचे साहित्य लंपास करणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीतील एकास सदर बाजार पोलिसांनी जेरंबद केले असून त्याच्या ताब्यातून चोरून नेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. जालना शहरातील साईनगर रामनगर परिसरातील फिर्यादी आशाबाई कडूबा सरकटे यांच्या घरी 27 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास निलेश भिंगारे व त्याच्या 10 ते 15 साथीदारांनी घरात घुसून घरातील लोकांच्या तोंडावर विषारी स्प्रे मारला त्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने घरातील कोणालाही आरडा- ओरड करता आली. याच दरम्यान दरोडेखोरांनी आयशर मध्ये घरातील घरगुती वापराचे साहित्य भरून घेवून गेले होते. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आनण्यासाठी पो.नि. संजय देशमुख यांनी उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सोबत तपास पथक पाठवून मुख्य आरोपी निलेश भिंगारे यास अटक करून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. तर आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. सदर काारवाई पोलिस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजश देशमुख, उपनि राजेंद्र वाघ, पोकॉ समाधान तेलंग्रे, इर्शाद पटेल, वैैभव खोकले, जतीन ओहळ, मोहन हिवाळे, होमतर्गा मोबीन शेख, अस्लम शेख , गायकवाड यांनी केली.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन