lokanand

तरूणावर हल्ला करून पसार झालेले जेेरबंद

सदर बाजार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
जालना(प्रतिनिधी) तरूणावर हल्ला करून पसार झालेल्या तील अनोळखी इसमांचा शोध लावून त्यांना जेरबंद करण्यास सदर बाजार पोलिसांना यश आले आहे
पाणीवेश भागातील रहिवाशी आदित्यराज जांगडे वय 20 वर्ष यांनी पोलिस स्टेशन सदर बाजार जालना येथे, तक्रार देऊन कळविले होते की, तीन अज्ञात इसमांनी पोते उचलण्याच्या आकुर्डीने मारहाण करून जखमी केले व करिज्मा गाडीवर पळून गेले वगैरे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथेगुन्हा रजिस्टर नंबर 61/ 2021 कलम 324 323 504 427 34 भादवी प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख यांनी पोलिस हेका.परशुराम पवार यांच्याकडे दिला नमूद गुन्ह्यात कुठलाही सबळ पुरावा व आरोपीचे वर्णन नावे नसल्याने आरोपी निष्पन्न करणे शर्तीचे काम असल्याने सदर गुन्ह्यात, श्री पवार यांनी तपासाची विशेष चक्रे फिरवून अज्ञात आरोपी निष्पन्न करून त्यांना आज रोजी सिंधी काळेगाव येथून ताब्यात घेऊन पोस्टेला हजर केले आहे त्यांचे, नावे1) बाबू उर्फ बब्बू पिता नसीर शेख वय 26 वर्ष राहणार गांधीनगर जालना 2)युनुस पिता रफिक पठाण वय 22 वर्ष व 3) अझर पिता नूर शेख वय 20 वर्ष तिघे राहणार गांधीनगर

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन