lokanand

राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालया मध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी

जालना,(प्रतिनिधी)-जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे दिनांक 29 1 2019 रोजी संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.य ाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुनंदा तिडके, प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रमोद ढोकणे यांनी प्रारंभी संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर प्रमोद ढोकणे म्हणाले की संत भगवान बाबा यांनी सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे तसेच गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घेऊन समाजामध्ये मोठे स्थान प्राप्त करावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुनंदा तिडके यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की संत भगवान बाबा यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून आध्यात्मिकाच्या माध्यमातून
संदेश दिले याच बरोबर व्यसनापासून दूर रहावे म्हणून सतत मार्गदर्शन करीत असे विशेष म्हणजे संस्थेला संत भगवान बाबा यांचे नांव आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांच्या तत्वानुसार आम्ही विद्यार्थ्यांसाठी वाटचाल करीत आहोत असे, प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एल.बी दरगुडे यांनी केले तर आभार प्राध्यापक सचिन जयस्वाल यांनी मानले या कार्यक्रमास प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन