lokanand

शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

निवडणूका असलेल्या राज्यांना योजनांची खैरात, बँकांसह महामार्ग, विमानतळांचे खाजगीकरण, कृषी उपकराच्या नावाखाली इंधन वाढीचा भडका, शिक्षण, रोजगार, महिला व बालकांकडे दुर्लक्ष, आर्थिक राजधानी मुंबई सह महाराष्ट्रास ठेंगा दाखवणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केली. 
कोरोना, लॉकडाऊन मुळे अनेकांचे रोजगार बुडाले होते. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, करदाते व सर्वसामान्य भारतीयांना यंदा च्या अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा होत्या मात्र त्या सर्व फोल ठरल्या. असे सांगून अर्जुनराव खोतकर  म्हणाले, पायाभूत सुविधांच्या नावाखाली पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ व आसाम या राज्यांतील निवडणूका डोळ्यासमोर ठेवून या राज्यांना योजनांची खैरात घोषित करण्यात आली तर आयडीबीआय सह अन्य दोन बँकांचे खाजगीकरण करून देशाची वाटचाल खाजगीकरणाचा दिशेने सुरू असल्याचे अधोरेखित केले. करदात्यांना कसलाही दिलासा दिला नाही,देशासाठी असलेला अर्थसंकल्प केवळ निवडणूकांसाठी च दिसून आला. एकूणच सर्व घटकांसाठी निराशाजनक असा अर्थसंकल्प आहे. असे ही अर्जुनराव खोतकर यांनी नमूद केले. 

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन