lokanand

जालना – औरंगाबाद महामार्ग दुरुस्तीसह सीसीटीव्ही, मदत केंद्रे कार्यान्वित करण्याचे आदेश ; अभिमन्यू खोतकर यांच्या मागणीची ना. शिंदे यांच्याकडून दखल

जालना ( प्रतिनिधी) : मराठवाड्याच्या राजधानीस जोडणाऱ्या जालना-औरंगाबाद महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. या रस्त्यावर  मदत केंद्रे,सी.सी.टी.व्ही.नसल्याने अपघातस्थळी पोहोचण्यास पोलीस व मदत यंत्रणांना उशीर लागत असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसह मदत केंद्रे, सीसीटीव्ही बसविण्यात यावे , तसेच महामार्गावर पोलीसांची गस्त  वाढविण्यात यावी अशा मागण्या युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी केल्या होत्या. त्यांची  रस्ते विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. 
युवासेना राज्यविस्तारक  अभिमन्यू खोतकर यांनी बुधवारी ( ता. ०३) पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे आणि ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जालना -औरंगाबाद महामार्गावरील समस्यांबाबत सविस्तर माहिती देऊन  येथे मदत यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी केली.ना. शिंदे यांना दिलेल्या लेखी निवेदनात अभिमन्यु खोतकर यांनी म्हंटले की, प्रमुख राज्य मार्ग -२ असलेल्या जालना – औरंगाबाद महामार्गाची अत्यंत बिकट दुरावस्था झाली असल्याने रहदारीस अडचण निर्माण होत आहे. अपघाताचे प्रमाण वाढले असून गत आठवड्यात दावलवाडी जवळ झालेल्या अपघातात तरुणांचा जीव गेला . शिवाय अनेकदा छोटे – मोठे अपघात घडतात. संबंधित विभागाचे या कडे दुर्लक्ष होत असून या मार्गाची तातडीने दुरूस्ती करणे गरजेचे असल्याचे  अभिमन्यु खोतकर यांनी निदर्शनास आणून दिले. गृह विभागाकडून पेट्रोलिंग होत नाही शिवाय या महामार्गावर  मदत केंद्रे व  सी .सी.टि.व्ही  कॅमेरे ही नाहीत. परिणामी वाहनधारकांना जीव मुठीत धरून  मार्गक्रमण करावे लागते. असे नमूद करत अभिमन्यु खोतकर यांनी सांगितले की, सदर महामार्ग दुरूस्ती बाबत  आय. आर.बी. कंपनी ला आदेश मिळूनही सुरूवात करण्यात आली नाही.  तरी सदर महामार्ग दुरूस्ती सह सीसीटीव्ही व मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात यावे. अशी मागणी अभिमन्यु खोतकर यांनी केली. त्यांच्या रास्त मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन रस्ते विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना रस्ते दुरूस्ती, मदत केंद्र उभारणी सह गस्त वाढविण्याचे आदेश दिले. या वेळी रविंद्र भुतेकर, सचिन सहाने, राजपूत उपस्थित होते. 

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन