lokanand

मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या

जालना,(प्रतिनिधी)- मोटार सायकली चोरणार्‍या दोन गुन्हेगारांच्या सदर बाजार पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून या चोरट्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली व एक स्कुटी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
जालना शहरा मोटार सायकल चोरीच्या घटना घडत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी मोटारसायकल चोरांचा तपास करण्याचेे आदेश दिले होते. त्यानुसार 3 फेबु्रवारी रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यातील डिबी पथकाचे कर्मचारी तपास करीत असताना एका मोटार सायकलवरून अशोक भिकाजी
तरकसे रा. कन्हैयानगर व आकाश रावसाहेब देवकर रा. लालबाग हे दोघे दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जात असताना त्यांना डिबी पथकाच्या कर्मचार्‍यानी पाठलाग करून पकडले. त्यांना ताब्यातील मोटरार सायकलबाबत विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे दिली. सदर मोटारसायकलची तपासणी केली असता ती चोरीस गेलेल्या गुन्ह्यातील माल असल्याचे दिसून आल्याने त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली देत आणखी दोन मोटारसायकली गोल्डणजुब्ली शाळेच्या मागे झाडीत लपून ठेवल्याचे सांगितले. त्या मोटार
सायकली व आणखी दोन मोटारसाकल व एक स्कुटी असा मुद्देमाल जप्त केला. सदरील कार्यवाही पोलिस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक रमेश रूपेकर, हेका रामप्रसाद रेंगे, पो.ना. धनाजी कावळे, सोमनाथ उबाळे, सुधीर वाघमारे,स्वप्नील राठेवाड, सोपान क्षीरसागर, योगेश पठाडे, समाधान तेलंग्र, जतीन ओव्हळ, संतोष खरात, महिला कर्मचारी सुमीत्रा अंभोरे यांनी केली.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन