lokanand

कडवंचीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची आ. गोरंट्याल यांची मागणी

जालना,(प्रतिनिधी)- जालना तालुक्यातील कडवंची येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र विधीमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. श्री वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनात आ. गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, जालना तालुक्यातील कडवंची हे गांव द्राक्ष उत्पादनासाठी ओळखले जाते. यंदाचा परतीचा पाऊस, अतिवृष्टी व सततच्या ढगाळ वातावरणामुळे कडवंची भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत द्राक्ष उत्पादनाची 72 कोटीची उलाढाल 12 कोटीवर येवून ठेपली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आर्थिक नुकसान भरपाईच्या शासनाकडून मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी व तोकडी आहे. त्यामुळे कडवंची भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत असून याप्रकरणी आपण गांभीर्याने दखल घेवून कडवंची परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सक्षम अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करुन त्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी या निवेदनात केली आहे. 

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन