lokanand

तीस लाखांची धाडसी चोरी

जालना(प्रतिनिधी) शहरातील नळगल्ली भागातील रहिवासी असलेल्या एका बिल्डरचे घर फोडून चोरट्यांनी एक किलो सोन्यासह डायमंडचे दांगिने असा सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने शहरातील व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली असून आज पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थाची पाहणी करून तपासाबाबत सदर बाजार पोलिसांना सूचना दिल्या.
या प्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, शहरातील नळगल्लीतील आबड निवास मधील रहिवाशी अंकुशल नरेंद्रकुमार आबड हे बिल्डीग बांधकामाचा व्यवसाय करतात. या ठिकाणी ते वडील, दोन भाऊ असे सह परिवार राहतात. शनिवारी ते परिवारासह लग्न समारंभासाठी पुणे येथे गेले होते. घरी वयोवृद्ध आजी त्यांच्या देखरेखीसाठी दोन नर्स व तीन वाचमन होते. रविवारी सकाळी 5 वाजता त्यांना वाचमनने वाड्यात चोर घुसल्याची माहिती दिली. बंद खोलीत लाईट सुरू असल्याचे सांगितले. तेव्हा आबड यांनी वाचमनला लावकर बधा मी पोलिसांना कळवितो असे सांगितले. त्यानी सदर बाजार पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पून्हा वाचमनचा फोन आला चोर पळून गेले म्हणून सांगितले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येवून परिसरात चोराचा शोध घेतला. मात्र चोर मिळून आले नाही. आबड घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलेे की, बेडरूमचा कडी कोडा तुटलेला, कुलूप तोउलेले, कपाट, तिजोरी फोडून चोरट्यांनी सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. त्यांनतर त्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक सानप ह्या करीत आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन