lokanand

विज बिल वसुली कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळे फासून बेदम मारहाण

परतुर- येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ दत्तात्रेय भोंगाने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका कर्मचार्‍यांसह रोहिणा येथे वीज बिलाच्या थकीत वसुलीसाठी गेले होते.नागापूर पाटीवर कर्मचारी चहा पीत असताना अचानक भगवान पाटोळे आणि नारायण पाटोळे या दोन भावांनी भोंगाने यांच्या तोंडाला काळे फासून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केलेयाप्रकरणी परतुर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा व विविध कलमाखाली तातडीने गुन्हा दाखल केल्याने व आरोपीला पकडण्यासाठी पथक रवाना केल्याने वीज कर्मचारी युनियन ने प्रारंभी आंदोलन करण्याची घेतलेली भूमिका मागे घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे वरिष्ठ लाईनमन चंदेल यांनी सांगितले. या घटनेतील आरोपी हे भाजपा समर्थक असल्याची माहिती आहे.या घटनेनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात भाजपाची मोठी शक्ती असल्याने व विद्यमान आमदार ही भाजपचे असल्याने हे प्रकरण कोणत्या वळणावर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.तालुक्यात वीज वितरण कंपनी ने वसुलुलीची मोहीम जोरात सुरू केली आहे, अनेक भागातील वीज पुरवठा ही त्यामुळे खंडीत केला जात असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर वसुलीची मोहिम थंडावते का वीज वितरण कंपनी आणखी जोमाने सुरु करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन